Mantra Yashacha Success Seminar in Marathi at Nashik

या एक दिवसीय सेमिनारमध्ये तुम्ही परिस्थितीवर प्रभुत्व मिळवाल आणि अविरत एका उत्कृष्ट आयुष्याची निर्मिती कराल.

सेमिनारचे फायदे -

अपयशाची भीती हद्दपार
जिथे मी तिथे संधी
प्रतिबंधक समजुतीपासून मुक्ती
स्वाभिमान आणि आत्मविश्वास
निर्णय घेण्याची क्षमता

आयुष्यात आपण जे जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला यशस्वी व्हायचं असतं आणि त्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. कधी आपण यशस्वी होतो तर कधी अपयशी. आपला आत्मविश्वास आणि स्वाभिमान बहुतेकवेळा आपल्याला मिळालेल्या यश-अपयशावर ठरतो. आपण कोणती कामे करणार किंवा सोडून देणार हे देखील आपल्याला कोणत्या क्षेत्रात किती यश किंवा अपयश मिळालं यावरच ठरते. त्याप्रमाणे काही कामे आपण करतो तर काही सोडून देतो.

पण काही गोष्टी अशा असतात कि ज्यावर आपलं पूर्ण आयुष्य अवलंबून असतं आणि ते आपण सोडू शकत नाही. पण कितीही मेहनत केली तरीही हवे असलेले यश काही केल्या आपल्याला मिळत नाही. 

अशावेळी लोकं आपल्याला सांगतात “कदाचित तुम्ही खूप नकारात्मक विचार करता आहात, त्या ऐवजी थोडा सकारात्मक विचार करा म्हणजे यश तुमचेच असेल”. मग लगेचच आपण ठरवतो देखील की आता मी फक्त आणि फक्त सकारात्मक विचारच करणार. पण जेमतेम २/३ मिनिटे आणि त्यानंतर पुन्हा आपण आपल्या जुन्या विचारांमध्ये कधी गुंतून जातो ते आपलं आपल्यालाही कळत नाही.

काही सांगतात “दृष्टीकोन बदला म्हणजे जग बदलेल”, पण दृष्टीकोन बदलायचा कसा हे मात्र कुणीच सांगत नाही. किंबहुना जे आपल्याला सांगतात, त्यानाही माहित नसते की दृष्टीकोन कसा बदलायचा. 

जे करायचं आहे ते कशाप्रकारे केले जाते हे जर माहित नसेल तर आपण ते करणार तरी कसे? शेवटी आपण तेच करतो जे पूर्वी करत होतो आणि तेच परिणाम मिळतात जे पूर्वी मिळत होते. फरक काहीच नसतो त्यामुळे आपण आपल्या आयुष्याचा रहाटगाडा नेहमीप्रमाणे तसाच पुढे ढकलत राहतो.

मंत्र यशाचा ह्या एकदिवसीय सेमिनारमध्ये तुम्ही तुम्हाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या यशासाठी स्वतःला तयार करून, कोणत्याही परिस्थितीपुढे हतबल होऊन नतमस्तक न होता, एक परिपूर्ण आयुष्य जगायला सुरुवात करता.

सेमिनार कुणासाठी? 
आयुष्यात एका विशिष्ट स्तरावर पोहोचल्यावर सुद्धा तिथेच न थांबता पुढे जाण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या लोकांसाठी मग तुम्ही उद्योगपती असाल किंवा राजकारणी, गृहिणी, विद्यार्थी, कामगार, नवीन उद्योजक, व्यवस्थापक, किंवा अगदी सेवानिवृत्त असलात तरीही.


 

Details

Share Event

Organizer

Location

Nashik, Maharashtra, India

Venue

Hotel Emerald Park, Nashik, Maharashtra, India

Address

Sharanpur, Holaram Colony, Sharanpur, Nashik, Maharashtra 422005, India

Event Date

05-02-2017 08:00AM

Tickets

Paid - Rs. 3500.00

Book